वडीगोद्री : श्री मत्स्योदरी देवी संस्थान नवरात्र महोत्सव 2020 ची बैठक पार पडली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार विद्याचरण कवडकर यांच्या उपस्थिती अध्यक्षेत बैठक पार पडली. या वेळी संस्थांचे सचिव व नायब तहसीलदार बाबुराव चंडोल,संस्थान विस्वस्त बाळासाहेब देशमुख,वसंतराव बल्लाळ,बाबासाहेब कटारे हे उपस्थित होते.
यावेळी नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने पार पडणार आहे.संसर्गजन्य महामारीमुळे ह्या वर्षी साध्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरले आहे.धार्मिक विधी करण्याचे ठरले आहे. त्यामध्ये 17 नोव्हेंबर रोजी वार शनिवार सकाळी 11 वाजता घटस्थापना या वेळी करण्यात येणार आहे. या संस्थांचे अध्यक्ष तथा तहसीलदार विद्याचरण कवडकर यांच्या हस्ते या घटस्थापनेला संस्थांचे विस्वस्थ व धार्मिक विधीसाठी संस्थान पुजारी, गावजोशी, आचार्य यांच्या उपस्थितीत घटस्थापना होईल. दि.18 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर या कालावधीत सकाळची पूजा, दुपारचे नैवद्य आरती व सायंकाळची आरती होईल. दि.24 नोव्हेंबर रोजी होम हवनास रात्री 11 वाजता प्रारंभ होईल. तसेच नवरात्र दरम्यान संस्थान परिसर दि.31 नोव्हेंबर रोजी परिसरातील दुकान बंद राहील. नवरात्र मधील धार्मिक कार्यक्रम गर्दीच्या अनुषंगाने रद्द करण्यात आले आहेत. त्यामध्ये दैनंदिन अभिषेक, नवदिवसाच्या पंगती दैनंदिन कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. यावेळी नवरात्र दरम्यान आलेल्या संसर्गजन्य महामारीला कसा बचाव करायचा.त्यासाठी जनजागृती करावे, योगसाधना, रक्तदान शिबिर करावे.
कोरोनामुळे कसा बचाव करावा यासाठी प्रयत्न करावे. श्री मत्स्योदरी देवीचे नवरात्र काळातील मंदिर बंद असल्यामुळे जास्तीत जास्त भाविक भक्तांना दर्शन देण्यासाठी संस्थान प्रयत्नशील आहे. त्यासाठी देवीच्या गाभार्‍यात लाईव्ह दर्शन व ऑनलाईन दर्शन देण्यासाठी अंबड शहरातील किबक टी.व्ही.चॅनल,
फेसबुक,व्हॉटसअप किंवा अन्य बाबीने भाविक भक्तांना दर्शन देण्यात येणार आहे.यावेळी संस्थांचे व्यवस्थापक कैलास शिंदे व संस्थान कर्मचारी बैठकीत उपस्थित होते.