औरंगाबाद : घाटीत सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा गेल्या चोवीस तासात मृत्यू झाला. त्यामुळे घाटीत कोरोनामुळे आतापर्यंत 745 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सहा पुरूष तर एका महिलेचा समावेश आहे. तसेच 19 रुग्णांना सोमवारी घाटीतून सुटी देण्यात आली. 

 यात भवानीनगरातील 85 वर्षीय वृध्दात रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास मृत्यू झाला. विश्रांतीनगरातील 65 वर्षीय वृध्दाचा 4 आक्टोबर रोजी दुपारी सव्वाएकच्या सुमारास मृत्यू झाला. किलेअर्क, काला दरवाजा येथील 85 वर्षीय वृध्देचा 3 आक्टोबर रोजी रात्री नऊच्या सुमारास मृत्यू झाला. पंढरपूरवाडी, भोकरदन, हसनाबाद येथील 25 वर्षीय तरुणाचा 4 आक्टोबर रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास मृत्यू झाला. हर्सुल येथील 51 वर्षीय पुरूषाचा सायंकाळी साडेसातच्या सुमारास मृत्यू झाला. गंगापुर, लांझी येथील 56 वर्षीय वृध्दाचा दुपारी एकच्या सुमारास मृत्यू झाला. तर हर्सुल, कोल्ठाणवाडी येथील 73 वर्षीय वृध्दाचा पहाटे चारच्या सुमारास मृत्यू झाला.