औरंगाबाद : कोरोनाच्या काळात गेल्या मार्च महिन्यापासून टाळेबंदी असल्याने सर्वच सार्वजनिक ठिकाणे हि बंद करण्यात आली होती. राज्यात आतासध्या अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असली तरी अजूनही मंदिरे ही मात्र बंद असल्याने यंदा गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सव देखिल भाविकांच्या अभावी अत्यंत साध्या पध्दतीने साजरा केली जाणार आहेत. यावर्षीच्या नवरात्रोत्सवात भाविकांच्या सुरक्षितेतेनुसार विविध संस्था, विश्वस्थ आणि पोलिसांनी शांतता समितीची बैठक घेत उत्सव साध्या पध्दतीने करण्याचे आवाहन केले आहे.


घाटनांद्रा : सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा जवळील सागमाळ शिवाराच्या डोंगरकुशीत वसलेल्या कुलस्वामिनी जोगेश्वरी देवीचा नवरात्रोत्सव यंदा अत्यंत साध्या पद्धतीने साजरा होणार असल्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतलेल्याची माहिती संस्थानाचे अध्यक्ष पुंडलिक राव मोरे व सांडू आप्पा कोठाळे यांनी दिली.
घटस्थापना आज शनिवारी होत असून दि.25ऑक्टोबरला विजयादशमी आहे. या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम भक्ता विना होणार आहेत. दरवर्षी अतिउत्साह मध्ये साजरा होणारा जोगेश्वरी देवीचा नवरात्र उत्सव यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच साध्या व सरळ पद्धतीने व भाविकांना शिवाय साजरा करण्याची वेळ स्थानावर आली आहे.
गेल्या सहा महिन्यापासून मंदिर बंद आहे त्यामुळे मंदिराला मिळणार्‍या देणग्या तही घट झाली आहे ही बंद आहे त्यामुळे मंदिर परिसरात छोट्या-मोठ्या दुकानदारांवर ही उपासमारीची वेळ आली आहे.
त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांनी या वर्षी आपापल्या घरीच देवीची आराधना करावी व शासनाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी भाविकांनी घ्यावी तसेच नवरात्र उत्सव देवीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरावर भाविकांनी येऊ नये असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष पुंडलिकराव मोरे, सांडू आप्पा कोठाळे, सकाराम नागरे, कृष्णा मोरे, सुनील मोठे, प्रकाश बारस्कर, सुरेश सिंग, बिसेन माधवराव तायडे आदींसह संस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे.


शिवना : कोविड- 19 च्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करत ग्रामदैवत शिवाई देविचा शारदीय नवरात्रोत्सव मर्यादीत स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. मंदिर विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने गुरुवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गरबा दांडिया रास रद्द करण्यात आला आहे. सामाजिक अंतर व मास्क आणि सॅनिटायझरचा प्रकार्षाने वापर करत देवीची दोन वेळची आरती व पारंपारिक पूजा विधी केला जाईल. शनिवारी (ता. 17) घटस्थापनेच्या दिवशी परंपरेप्रमाणे येथील भाविक अशोक केसरीनाथ गोसावी (जैन) यांच्या घरून देवीचे पातळ, मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत सवाद्य मिरवणुकीने आणले जाईल. नवरात्रीचे 9 दिवस हा उत्सव चालणार असून मंदिरावर मर्यादित विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.