औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील लॉकडाऊन रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने काल राञी घेतला होता. त्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. खासदार जलील यांच्या या कृतीवर राज्यभरातून जोरदार टीका झाली. त्यानंतर खासदार जलील यांनी चूक झाल्याची कबूली दिली आहे. जलील म्हणाले, होय माझी चूक झाली. कायद्यानुसार जरुर कारवाई करा. पण, नियम मोडणाऱ्या सर्वच नेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जलील यांनी केली आहे. 
जलील पुढे म्हणाले आहे की, होय माझी चूक झाली. कायद्यानुसार जरुर कारवाई करा. सर्वसामान्यांना जो कायद्या त्यानुसार माझ्यावरही कारवाई करा. मात्र, मीच काय तर देशातील अनेक नेते नियम मोडतात. त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जलील यांनी केली आहे.