औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीच्या प्रचारासाठी शिवसेनेने औरंगाबाद शहरात दोन दिवस संघटनात्मक बैठकांचे आयोजन केले आहे. शाखाप्रमुख, गटप्रमुख, सहगटप्रमुख, महिला व युवासेनेच्या वॉर्ड स्तरावरील या बैठका 23 व 24 नोव्हेंबर रोजी होणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी शुक्रवारी दि.20 दिली. या बैठकांमध्ये प्रामुख्याने पदवीधर निवडणुक, प्राथमिक सदस्य नोदंणी फॉर्म संकलित करणे, मतदार नोंदणी मोहीम व बुथ समिती संघटन पुर्वतयारी यावर मंथन होणार आहे.
पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, महानगरप्रमुख आ. प्रदीप जैस्वाल, आ. संजय शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी 23 तारखेला सकाळी 10 वाजता उपशहरप्रमुख संजय हरणे, सकाळी साडेअकरा वाजता गणपत खरात, संदेश कवडे, तर दुपारी 4 वाजता जयसिंग होलीऐ, शिवा लुंगारे, सायंकाळी 5 वाजता बाळासाहेब सानप, सुरेश कर्डीले, 6 वाजता मकरंद कुलकर्णी, अनिल जैस्वाल, रात्री 7 वाजता दिग्विजय शेरखाने, ज्ञानेश्वर डांगे, तर रात्री 8 वाजता वामन शिंदे, संतोष खेडंके याच्या कार्यक्षत्रातील पदाधिकार्‍यांच्या बैठका होणार आहेत. दुसर्‍या दिवशी मंगळवारी 24 तारखेला सकाळी 10 वाजता सुभाष कच्छवाह, राजेंद् दानवे, चंद्रकांत इंगळे, तर अकरा वाजता हिरा सलामपुरे, दुपारी 12 वाजता सुगंधकुमार गडवे, 4 वाजता अंबादास म्हस्के, सांयकाळी 5 वाजता राजु राजपुत, सनी बारवाल, संतोष मरमट, 6 वाजता प्रमोद ठेगंडे, अनिल मुळे, रात्री 7 वाजता बापु पवार, रजन साबळे तर रात्री 8 वाजता वसंत शर्मा व रमेश बहुले यांच्या कार्यक्षेत्रातील पदाधिकार्‍यांच्या बैठका होणार आहेत. या सर्व बैठकांना उपस्थित राहण्याचे आवाहन शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विस्वानाथ स्वामी, महिला आघाडीच्या सहसंपर्क संघटक कला ओझा, सुनिता आऊलवार, जिल्हासंघटक सुनिता देव यांनी केले आहे.