फर्दापूर : आरोग्य सर्वेक्षणा दरम्यान घेण्यात आलेल्या कोव्हीड 19 चाचणीत फर्दापूर (ता.सोयगाव) येथील एकाच कुटुंबातील पाच सदस्य कोरोना पॉझिटीव्ह आले असून बाधितांन मध्ये एक पुरुष एक मुलगा दोन मुली व एक महीला असा पाच लोकांचा समावेश आहे. बाधितांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी जरंडी कोव्हीड उपचार केंद्रात दाखल करण्यात आले असल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास सोनवणे यांनी दिली.
जरंडी कोव्हीड उपचार केंद्रात उपचार घेणार्या फर्दापूर येथील एकूण बाधितांची संख्या आठ झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव बघता आरोग्य विभागाच्या वतीने फर्दापूर येथे दरोज आरोग्य सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेत आशा सेविका प्रत्येक प्रभागात घरोघरी जावून थर्मलगन व पल्स ऑक्सीमिटरच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणी करीत आहे. दरम्यान दि.27 सप्टेंबर रोजी आशा सेविकांनी केलेल्या सर्वेक्षणात जामनेर येथून फर्दापूर येथे राहण्यासाठी आलेल्या एका कुटूंबातील सदस्याच्या आरोग्या बाबत सर्वेक्षण करणार्या पथकाला संशय जाणवल्याने त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे यांना ही माहीती देताच जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने तातडीने फर्दापूर येथे दाखल होवून या कुटूंबातील सदस्यांची कोव्हीड 19 ंटीजन चाचणी करुन घेतली यात एकाच कुटुंबातील एक पुरूष, दोन मुली, एक महीला व एक मुलगा अश्या एकूण पाच सदस्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने रविवारी सायंकाळी पाच ही बाधितांना तातडीने पुढील वैद्यकीय उपचारासाठी जरंडी कोव्हीड उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान जरंडी कोव्हीड उपचार केंद्रात उपचार घेणार्या फर्दापूर येथील एकूण बाधितांची संख्या आठ झाली आहे.