औरंगाबाद : राज्य सरकारच्या निर्देशानुसार इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या माध्यमिक शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहेत. या अनुषंगाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. नुसार महापालिकेतर्फे शहरातील 16 स्वॅब कलेक्शन सेंटरवर कोरोना चाचणी केली जात आहे.

गुरूवारी दिवसभरात 1044 शिक्षकांची कोरोना चाचणी झाली. तर शुक्रवारी दि.20 रोजी 1393 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. कालच्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला. त्यातून 8 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात 3 पालिका हद्दीतील व 5 बाहेरील शिक्षक आहेत. यात चिकलठाणा आरोग्य केंद्र रामनगर, रिलायन्स मॉल, शिवाजीनगर, तापडिया कासलीवाल मैदान, बायजीपुरा, हर्षनगर, सिडको एन 8, एन 11, एन 2, छावणी, सिपेट कोविड सेंटर, किलेअर्क, एमजीएम, पदमपुरा, एमआयटी कोविड सेंटर या सर्व ठिकाणी कोरोना चाचणी केली जात आहे.