औरंगाबाद : घाटी रुग्णालयात गेल्या चोवीस तासात आठ कोरोनाबाधितांनाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. फुलंब्री, बोरगाव अरी येथील 65 वर्षीय वृद्धेचा गुरुवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. बेगमपुर्‍यातील 75 वर्षीय वृद्धाचा सकाळी 11 वाजेच्या सुमारास, धोत्रा, सिल्लोड येथील 82 वर्षीय वृद्धाचा सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास, हनुमान घाट रोड, जालना येथील 56 वर्षीय वृद्धाचा दुपारी सव्वा एक वाजता, वैजापूर, दहेगावातील 64 वर्षीय वृद्धेचा दुपारी अडीचच्या सुमारास, लासुर स्टेशन, गंगापूर 65 वर्षीय वृद्धाचा सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास, तर गजानन नगर, गारखेडा येथील 78 वर्षीय वृद्धाचा 14 ऑक्टोबर रोजी सकाळी साडे सात वाजता आणि मिसारवाडीतील 54 वर्षीय महिलेचा शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. शुक्रवारी घाटीतून अठरा रुग्णांना सुटी देण्यात आली. सध्या घाटीत दाखल 90 रुग्णांची प्रकृती चिंताजनक तर 78 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.