औरंगाबाद : विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेतील गोंधळ कायम आहे. गुरूवारी दि.6 रोजी पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांचा इतिहासाचा पेपर होता. इतर पेपरला विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेतून प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र, इतिहासाच्या पेपरवेळी केवळ मराठी भाषेतूनच प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्याने इंग्रजी भाषेतून पेपर देणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. दरम्यान आता ज्या विद्यार्थ्यांना इतिहासाचा पेपर इंग्रजीतून देता आलेला नाही. त्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. या गोंधळामुळे ज्या विद्यार्थ्यांना इतिहासाचा पेपर देता आलेला नाही, त्या विद्यार्थ्यांना सोमवारी पोर्टलवर इंग्रजीतून पेपर उपलब्ध होणार आहे,  अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील यांनी दिली.