विहामांडवा : पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र चोंडाळा येथील श्री रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याच्या 2021-22 च्या पाचव्या गळीत हंगामाची बॉयलर अग्निप्रदीपनचा कार्यक्रम सोमवारी (दि.18) सकाळी 10 वाजता कारखान्याचे चेअरमन तथा राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कारखान्याचे संचालक लहू डुकरे व कल्याण धायकर यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत पूजन करून संपन्‍न झाला.
कारखान्याची दुरूस्तीचे काम पूर्ण झाले असून 24 ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करणार असल्याचे यावेळी चेअरमन मंत्री भुमरे यांनी सांगितले. कार्यक्षेत्रात अतिरिक्त ऊस असल्यामुळे कारखाना लवकर सुरू करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस तोडणी होईपर्यंत कारखाना सुरू ठेवून पूर्ण क्षमतेने गाळप करणार आहे. तीन लाख मे. टनाचे उद्दिष्ट ठेवले आहे.  यावेळी रेणुकादेवी शुगर मिलचे दत्तात्रय रेवडकर, रोहिदास रेवडकर, मार्केट कमिटीचे चेअरमन राजू नाना भुमरे, विलास भुमरे, दूध संघाचे संचालक नंदलाल काळे, व्हा. चेअरमन मानिकराव थोरे, अशोक भवर, सुभाष चावरे, डॉ. सुरेश चौधरी, भरत तवार, सुरेश दुबाले, विष्णु नवथर, संदीपान काकडे, रावसाहेब घावट, महाविर काला, सोमनाथ परदेशी, ज्ञानोबा बोडखे, दत्तात्रय वाकडे, सुभाष गोजरे, शेख महेबुब सालार पटेल, नंदु पठाडे, संचालक यांच्यासह कार्यकारी संचालक नामदेव बावडकर, दादा बारे, बाबुराब पडूळे, सुनील डुकरे, अंबादास नरवडे, प्रदीप नरके,श्रीमंत टेकाळे, खात विभाग प्रमुख अधिकारी-कर्मचारी व मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकरी सभासद उपस्थित होते.