टाकळी राजेराय : खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेराय जाण्यासाठी बाजार सावंगी येथून मुख्य रस्ता असून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी होत आहे. बाजार सावंगी-टाकळी राजेराय रस्त्याची दुरवस्था झाली असून खड्डयात रस्ता की रस्त्यात खड्डे आहेत, हे मात्र वाहनधारकांच्याही लक्षात येत नाही. या रस्त्यासाठी टाकळी राजेराय येथील नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनकडे लेखी निवेदन दिले आहे. मात्र या कडे दुर्लक्ष करण्यात आले. वेळीच या रस्त्याचे काम करावे, अशी मागणी नागरिकामधून होत आहे.