औरंगाबाद : राज्यातील अनेक लसीकरण केंद्रात लसीचा तुटवडा भासत आहे. लसी उपलब्ध नसल्याने अनेक केंद्र बंद आहेत. विद्यापीठात लसीकरण केंद्र सुरू करून वेळेवर लस मिळाली नाही, तर लसीकरण केंद्र सुरू करून फायदा होणार नाही. इतर केंद्रावर लसी मुबलक प्रमाणात मिळायला लागल्या की विद्यापीठ देखील लसीकरण केंद्र सुरू करणार आहे, अशी माहिती सूञांनी दिली आहे.
 उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ स्तरावर लसीकरण केंद्र सुरू करून विद्यापीठातील विद्यार्थ्यांना लस टोचून घेऊ, असे सांगितले होते. या पार्श्वभूमिवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात लवकरच कोरोना लसीकरण केंद्र सुरू करणार आहे. लसीकरण केंद्राच्या नियोजनाची तयारी सुध्दा विद्यापीठ करत आहे. त्यासंदर्भात लवकरच आढावा बैठक बोलवण्यात येणार असल्याची माहिती मिळते. माञ, राज्यात कोरोना लसीचा तुटवडा असल्याने विद्यापीठ लसीकरण केंद्र सुरू करण्यास चालढकल करत आहे. कारण, राज्यातील अनेक लसीकरण केंद्रात लस उपलब्ध नसल्याने बंद ठेवण्यात आले आहे. याच लसीकरण केंद्रावर लसीचा साठा पुरेसा नाही. विद्यापीठात केंद्र सुरू करून विद्यापीठाला वेळेवर लस मिळाली नाही. तर लसीकरण केंद्र सुरू करून फायदा होणार नाही. इतर केंद्रावर मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध व्हायला सुरूवात झाली, तर विद्यापीठात देखील लसीकरण केंद्र सुरू करून, विद्यार्थ्यांना लस टोचून घेण्यात येईल, असे संबंधितांनी सांगितले आहे.

नियोजनावर चर्चा : विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात किती लसीकरण केंद्र सुरू करायचे. दररोज किती विद्यार्थ्यांचे लसीकरण करायचे. सरकार किती लस उपलब्ध करून देणार, यावर विद्यापीठ चर्चा करत आहे.