औरंगाबाद : लखीपूर घटनेच्या निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडीने सोमवारी दि.11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला औरंगाबाद शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुख्य बाजारपेठेसह शहरातील विविध भागातील काही दुकाने वगळता बहुतांश दुकाने दिवसभर खुली होती. मात्र जिल्हा व्यापारी महासंघाचा बंदला पाठिंबा नसल्याने शेतकर्‍यांवरील हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करत बहुतांश व्यापार्‍यांनी दुकाने उघडी ठेवली. उत्तरप्रदेश राज्यातील शेतकर्‍यांवर झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ औरंगाबाद शहरात पुढे रोजी रोटीचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्यामुळे अनेक रिक्षाचालकांनी आपला दैनंदिन व्यवहार सुरूच ठेवला होता, असे रिक्षाचालक संघटनेच्या एका पदाधिकार्‍याने सांगितले.