औरंगाबाद : प्रादेशिक परिवहन कार्यालयात रीक्षा चालक संघटनेची बुधवारी दुपारी बैठक पार पडली. या बैठकीत सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने यांनी ऑटोरिक्षात फक्त दोनच प्रवाशी घेऊन जाता येईल. तिसरा प्रवासी आढळल्यास रिक्षा जप्त करून दंड  ठोठावण्यात येईल, असा इशारा या बैठकीत देण्यात आला.

प्रादेशिक परिवहन कार्यालयात बुधवारी दुपारी ऑटोरिक्षा चालक संघटनेची बैठक पार पडली.या बैठकील रिक्षा चालक संघटनेचे पदाधिकारी आणि रिक्षा चालक मोठया संख्येने उपस्थित होते. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने यांनी कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व ऑटोरिक्षा चालकांनी शासनाने घालून दिलेल्या नियम व अर्टी शर्तीचे काटेकोरपणे पालन करावे. रिक्षा रस्त्यावर उतवतांना रिक्षाचे फिटनेस प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. विना फिटनेस प्रमाणपत्र रिक्षा रस्त्यावर आणली तर रिक्षा जप्त करून दंड आकारला जाईल. तसेच प्रत्येक रिक्षा चालकानी आपल्या रिक्षात दोनच प्रवासी बसवावे, लॉकडाऊन नियमाचे उल्लघन केल्यास रिक्षा जप्त करून दंड आकारला  जाईल. यावेळी रिक्षा चालकांच्या काही सूचना मागण्या असतील तर त्या लेखी स्वरूपात संघटनेच्या पदाधिकाजयांनी द्याव्यात असे ही माने यांनी आवाहन केले. या बैठकीला रिक्षा चालक संयुक्त संघर्ष कृती महासंघाचे अध्यक्ष निसार अहेमद खान, एस.के.खलील, कैलास शिंदे, शेख नजीर, मोहम्मद बशीर, शेख लतील यांंच्यासह रिक्षा चालक संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.