(संग्रहित छायाचिञ)
औरंगाबाद :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल संगणकीय प्रणालीवर शाळांकडून भरून घेत आहे. परंतु, शाळांनी निकाल भरताना अक्षम्य चुका करून ठेवल्या आहे. या चुका दुरूस्त करण्यास वेळ लागत असल्याने औरंगाबाद विभागीय मंडळाने बोर्डाकडे मुदतवाढ वाढून देण्याची मागणी केली आहे, अशी माहिती औरंगाबाद विभागीय मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी दिली आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमिवर दहावीच्या परिक्षा रद्द केल्या आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना यंदा नववी आणि दहावी वर्गांच्या अतंर्गत मूल्यांकनाच्या आधारे उत्तिर्ण करण्यात येणार आहे. दहावीचा निकाल 15 जुलैपर्यंत जाहीर करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंञी वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले आहे. माञ, हा निकाल ठरलेल्या कालावधीत लागेल, याची शक्यता कमीच आहे. कारण शाळांनी विद्यार्थ्यांचा निकाल भरताना अनेक चुका करून ठेवल्या आहेत. या चुकाच विद्यार्थ्यांच्या निकालाला अडसर ठरत आहे. या चुका किचकट असल्याने औरंगाबाद विभागीय मंडळाने बोर्डाकडे निकाल पूर्ण करण्यासाठी आणखी एकदा मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे, अशी माहिती मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी दिली. या संदर्भात अधिक माहिती देण्याची विनंती दैनिक आदर्श गावकरीने केली, असता पुन्ने यांनी नकार देत फोन बंद केला.