औरंगाबाद : सिडको एन-6 एमजीएम परिसरातील प्रियदर्शिनी उद्यानात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मुर्तीकार शशिकांत वडके यांनी शनिवारी दि.23 ऑक्टोबर रोजी या पुतळ्याच्या साईटवरील जागेची पाहणी केली. आता पुतळा तयार करण्याबद्दलची चर्चात्मक बैठक पुढील आठवड्यात मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत होणार आहे.
  औरंगाबाद पालिकेच्या वतीने सिडकोतील प्रियदर्शिनी उद्यानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन व उद्यान विकसित केले जात आहे. या उद्यानात शिवसेनाप्रमुखांचा भव्य पुर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. या पुतळ्यासाठीच्या चबुतर्‍याचे काम आता जवळपास पूर्णत्वास आले आहे. याच परिसरात वस्तुसंग्रहाय देखील तयार केले जाणार आहे. वस्तुसंग्रहालयाच्या इमारतीचे काम देखील सुरू आहे. आहे. मुलभूत कामांनी गती घेतल्यामुळे पुतळ्याचे काम सुरु करण्याच्या उद्देशाने पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मुंबईतील प्रसिध्द मुर्तीकार शशिकांत वडके यांना शुक्रवारी औरंगाबादेत बोलावले होते. वडके यांच्या बरोबर त्यांनी पुतळा उभारण्याच्या साईटची पाहणी केली. त्यांनी पुतळ्यासाठीच्या चबुतर्‍याची बारकाईने पाहणी केली. पुतळा कसा असावा, याबद्दल त्यांनी पालकमंत्र्यांबरोबर चर्चा देखील केली. यासंदर्भात माहिती देताना पालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सांगितले की, शिवसेनाप्रमुखांचा पुतळा कसा असावा याबद्दल शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच निर्णय घेणार आहेत. त्यासाठी पु