औरंगाबाद : 
खासदार सुप्रिया सुळे यांनी औरंगाबाद जिल्ह्याचा फेरफटका मारून ऐतिहासीक सौंदर्याच्या कामांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील ऐतिहासीक सौंदर्य पाहिल्यानंतर खासदार सुळे प्रचंड चिडल्या अन् जिल्ह्यातील खासदार, आमदारांना झापले. यावेळी त्यांनी मला या मतदार संघातून निवडुण द्या. विकास कसा करतात ते दाखवते, असे म्हणताच सुप्रिया सुळे यांना औरंगाबादेतून 2024 ची लोकसभा निवडणूक लढवावी, अशी ऑफर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने दिली आहे.
  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नागराज गायकवाड यांनी खा. सुप्रिया सुळे यांना पञ लिहीले आहे. या पञात सुळे यांनी औरंगाबादेतून 2024 ची लोकसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी केली आहे. पञात म्हटले आहे की, औरंगाबाद ऐतिहासिक नगरीची येथील राजकारण्यांनी जातीचा आधार घेवून दुरावस्था केली आहे. औरंगाबादला आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक दर्जा आहे. त्यामुळे लाखो पर्यटक औरंगाबादला भेट देत असतात. मात्र येणारा पर्यटक येथील ऐतिहासीक वास्तुंची दुरावस्था बघून नाराज होऊन परततो. अशीच काहीशी नाराजी खासदार सुळे यांची झाली अन् सुळे संतापल्या. औरंगाबादची दुरावस्था बघून सुळे यांनी, मला या मतदार संघातून निवडुण द्या. मी विकास कसा असतो ते दाखवते, असे म्हणाल्या. सुळे यांनी या मतदार संघात निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्‍त केली. तेव्हा त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने औरंगाबादेत निवडणूक लढण्याची ऑफरच दिली. सुळे यांनी औरंगाबादेतील लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी. आमच्या पक्षाचा संपूर्ण पाठींबा असेल. तसेच औरंगाबादचे लोक आपल्या विकासाला पाठींबा देवून आपल्याला निवडुण आणतील. तसेच आमचा पक्ष देखील तुम्हाला संपूर्ण पाठींबा देईल. पक्ष संघटनेच्या पलीकडे जाऊन आम्ही तुम्हाला मदत करू आणि निवडुण आणू. तुम्ही निवडुण आल्यावर आम्हा औरंगाबादकरांना तुमच्या सारख्या कर्तुत्ववान संवेदनशील लोकप्रतिनिधी खासदार म्हणून लाभेल अन् औरंगाबाद ऐतिहासीक नगरीच्या थांबलेल्या विकासाला गती मिळेल, असे या पञात म्हटले आहे.