औरंगाबाद (ऋषिकेश श्रीखंडे) : शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये दि.4 ऑक्टोबर पासून सुरू झाली आहेत. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांत विद्यार्थी नियमित हजर राहत आहे. माञ दहवी वर्गात गुणांचा पाऊस पाडण्यार्‍या विद्यार्थ्यांना पुढे प्रवेश कशाला घ्यावा, ही अडचण निर्माण झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी अंदाजेच प्रवेश घेतल्याचे कळते. कला, वाणिज्य अन् विज्ञान या शाखेत प्रवेश घेतल्यानंतर पुढे काय करता येते, हे देखील विद्यार्थ्यांना माहिती नसल्याचे उघड झाले आहे. या सर्व प्रकाराला ऑनलाइन शिक्षणाचा फटका बसला आहे, असे औरंगाबाद शहरातील प्राचार्यांचे म्हणणे आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शिक्षणाचे दारे बंद होते. मागील दीड वर्षांपासून विद्यार्थी वर्गात नव्हते. सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येत होते. माञ, विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाकडे दुर्लक्ष करत होते. याचा मोठा परिणाम आता विद्यार्थ्यांवर दिसून येत आहे. दहवी वर्गात भरमसाठ गुण घेणार्‍या विद्यार्थ्यांना साधे कला, वाणिज्य अन् विज्ञान या शाखा कळेना झाल्या आहे. कला शाखेत शिक्षण घेतल्यानंतर पुढे काय करता येईल. वाणिज्य शाखेत शिक्षण घेतल्यानंतर पुढे काय करता येते. विज्ञान शाखेत शिक्षण घेतल्यानंतर पुढे काय करता येते, हे देखील विद्यार्थ्यांना माहिती नाहीये. आता शिक्षक वर्गावर गेल्यानंतर विद्यार्थ्यांना या शाखांबद्दल माहिती देताय. यावेळी, विद्यार्थ्यांना या शाखांबद्दल माहिती मिळते आहे. त्यानंतर विद्यार्थी लगेच शाखा बदलून घेत आहे. तसेच, विद्यार्थींना या ऑनलाई शिक्षणामुळे मोबाईलचा मोठा छंद लागला आहे. विद्यार्थी वारंवार तासिके दरम्यान मोबाईल बघता, असे देखील एका शिक्षकाने आदर्श गावकरीशी संवाद साधताना सांगितले. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिक्षणाची सवय लावण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे, असे देखील शिक्षकांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांचा ऑफलाइन वर्गाला प्रतिसाद : ऑनलाइन वर्गाला विद्यार्थी कंटाळले होते. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन ऑनलाईन वर्गात होत नव्हते. शिक्षकांना देखील विद्यार्थ्यांना समजावून सांगणे अवघड जात होते. त्यामुळे, विद्यार्थी देखील ऑनलाईन शिक्षणाकडे दुर्लक्ष करत होते. माञ, आता ऑफलाईन वर्गाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थी देखील कोरोना नियमांचे पालन करून उपस्थित राहत आहे.

दहावी वर्गात विद्यार्थी ऑफलाइन शिक्षण घेत असताना शिक्षक कला, वाणिज्य अन् विज्ञान शाखांची ओळख करून देत होते. माञ मागील दीड वर्षापासून ऑनलाइन शिक्षण असल्यामुळे विद्यार्थ्यांना या शाखांची ओळख करून दिलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता या अडचणी निर्माण होत आहे. तसेच विद्यार्थ्यांवर आई-वडिलांचे मोठे अपेक्षांचे ओझे असते. त्यामुळे विद्यार्थी देखील आई-वडिलांची मर्जी राखत शाखांची निवड करतात. माञ सदरील विद्यार्थ्यांला त्या शाखेतील विषय देखील माहित नसतात. तसेच ऑनलाइन शिक्षणामुळे देखील विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम झाला आहे.
आर.बी.गरूड, उपप्राचार्य, देवगिरी कनिष्ठ महाविद्यालय.