औरंगाबाद : पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी राज्यस्तरीय प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पहिली फेरी संपली असून दुसर्‍या फेरीत नावे आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ मिळाली आहे. दुसर्‍या फेरीत नावे आलेल्यांना 7 ऑक्टोबरपर्यंत प्रवेश घेण्याची शेवटची तारीख होती. माञ, आता या विद्यार्थ्यांना 11 ऑक्टोबरपर्यंत प्रवेश घेता येईल, अशी माहित तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक महेश शिवणकर यांनी दिली.औरंगाबाद जिल्ह्यात पॉलिटेक्निकच्या एकूण 13 संस्था आहेत. या संस्थांची प्रवेश क्षमता 3 हजार 910 इतकी आहे. या 3 हजार 910 जागांसाठी 5 हजार 260 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे. राज्यस्तरीय प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत नावे आलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची मुदत संपली आहे. तर दुसर्‍या फेरीत नावे आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ मिळाली आहे. दुसर्‍या फेरीत नावे आलेल्या विद्यार्थ्यांना 7 ऑक्टोबरपर्यंत प्रवेश घेण्याची शेवटची तारीख होती. माञ, आता या विद्यार्थ्यांना 11 ऑक्टोबरपर्यंत प्रवेश घेता येतील, असे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. त्यामुळे दुसर्‍या फेरीतील विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश निश्‍चित करावेत, असे आवाहन तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक महेश शिवणकर यांनी केले आहे.

11 ते 20 तारखेदरम्यान संस्थास्तरिय फेरी :  सुरूवातीच्या या दोन प्रवेश फेर्‍यांत महाविद्यालयांच्या जागा पूर्ण भरल्या नसतील तर त्या महाविद्यालयामध्ये संस्थास्तरिय फेरी राबवण्यात येणार आहे. या फेरीच्या माध्यमातून महाविद्यालयांना रिक्त जागा भरता येतील. महाविद्यालयांना ही फेरी 11 ते 20 ऑक्टोबरपर्यंत राबवता येईल. या फेरीतून जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांना कुठल्याही शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही. त्यांना पॉलिटेक्निकच्या महाविद्यालयांची फिस देखील पूर्ण भरावी लागेल, अशी माहिती महेश शिवणकर यांनी दिली.