औरंगाबाद - आयटक संलग्न महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेतर्फे पाठपुरावा केल्याने राज्य शासनाकडून एक कोटी रुपयांचा निधी कोरोना योद्धा सफाई कामगारांसाठी जानेवारी, फेब्रुवारीचे थकीत वेतन देण्यासाठी आला. मात्र तो निधी इतर कामासाठी आणि कंत्राटदारांच्या तुंबड्या भरण्यासाठी वापरण्याचे षडयंत्र घाटी प्रशासन आखत आहे, असा आरोप महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटकने केला आहे. त्यामुळे अद्यापही या कामगारांना वेतन मिळालेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याबाबत संघटनेचे अ‍ॅड. अभय टाकसाळ यांनी सांगितले की, आता संयम संपत आला असून पुढील 4 दिवसात वरील मागण्या मंजूर न झाल्यास आंदोलनाचे पुढचे पाऊल उचलावे लागेल, असा इशारा टाकसाळ यांनी दिला असून पगार, बोनस न मिळल्यास कोविड योद्धे बेमुदत संपावर जातील असा इशाराही युनियनचे सेक्रेटरी अ‍ॅड अभय टाकसाळ, किरणराज पंडीत, विकास गायकवाड, गजानन खंदारे, महेंद्र मिसाळ (शाखा सचिव, घाटी), नंदा हिवराळे, अजहर जिलानी शेख, अभिजीत बनसोडे, समाधान ब्राम्हणे, आरेफ सय्यद शाकेरा, प्रमोद नाडे, संतोष बिरारे, सुशिल कांबळे, अविनाश देहाडे, छाया लोखंडे, आम्रपाली जोगदंडे, नंदा हिवराळे, वनिता जाधव, सतिश दांडगे आदी कामगारांनी दिला आहे.