औरंगाबाद : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या टीव्ही सेंटर सेवा केंद्र येथे कोरोनाच्या शासननियमांचे पालन करून वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सभासद व ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.  यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्वाना संस्थेचा वार्षिक अहवाल वाटप करून संस्थेने केलेल्या प्रगतीची माहिती सभासदांना देण्यात आली. सभासदांनीदेखील आम्ही कायम संस्थेच्या प्रगतीत सोबत असू अशी ग्वाही देउन आदर्श नागरी सहकारी संस्थेवरील विश्वास अधोरेखित केला. यावेळी शाखा व्यवस्थापक शिवाजी शिंदे, शाखेचे कर्मचारी मनोज गाढेकर, गीता जाधव, अश्विनी शिरसाट तसेच सभासद व ठेवीदार आनंद नागरे, बाजीराव शेजवळ, दत्तात्रय उदावंत, ज्ञानेश्वर महालकर, हरी बाळू बाविस्कर, सुरेश दाभाडे आदी उपस्थित होते. व्यवस्थापक शिवाजी शिंदे यांनी आभार मानले.