औरंगाबाद : कोरोनाबाधितांची संख्या कमी असली तरी कोरोनाच्या पहिल्या आणि दूसर्‍या लाटेत 3 हजार 490 जणांना प्राण गमवावे लागले. संभाव्य तिसर्‍या लाटेत मृत्यूदर कमी करण्यासाठी डॉक्टरांची टिम मृत्यूचे विश्लेषण करत आहेत. तसेच टेस्टिंगचे प्रमाण वाढवण्यात येणार असून सुपरस्प्रेडरवर कठोर कारवाई केली जाईल असे जिल्हाधिकरी सुनील चव्हाण यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवार, 30 रोजी पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी ही माहिती दिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे उपस्थित होते. बहुतांश मृत्यू हे घाटीत झाले कारण बाधिताची अवस्था अत्यंत गुंतागुंतीची झाल्यानंतर त्यांना घाटीकडे पाठवले जात होते. हे करताना रुग्णवाहिकेला उशीर झाला का, तीच्यात सुविधा होत्या का आदी बाधिताच्या मृत्यूला कारणीभुत कोणत्या बाबी आहेत त्यांचा शोध घेतला जात आहे. यातुन संभाव्य तीसर्‍या लाटेत उपाययोजना करता येतील असे चव्हाण यावेळी म्हणाले. लसीकरणासाठी सध्या पुरेशा लस आहेत. जिल्ह्यासाठी 57 हजार लस आल्या आहेत त्यापैकी ग्रामीणसाठी 40 हजार तर शहरासाठी 17 हजार लस देण्यात आल्या आहेत. नागरीकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन करून चव्हाण यांनी, चाचण्यांचे प्रमाण वाढविणे, रिक्षावाले, भाजीवाले, दुधवाले, दुकानदार या सुपरस्प्रेडरांची टेस्टींग करण्यावर भर देणे, मास्क न वापरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई, जप्ती, सील ठोकणे अशा कठोर कारवाईच्या सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

संभाव्य तिसर्‍या लाटेसाठी ऑक्सिजन पुरेसे : जिल्ह्यात ऑक्सिजनची भरपूर उपलब्धता आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनचे 24 प्लांटचे नियोजन करण्यात आले असून 4 प्लांट सुरू झालेले आहेत. उर्वरीत प्लांटची किरकोळ कामे बाकी असून तेदेखील आठ दिवसात पुर्ण होतील. तसेच शासकीय स्तरावरच्या प्लांटमध्ये 15 मेट्रीक टन तर खासगीच्या प्लांटमध्ये 5 मेट्रीक टन असे रोज 20 मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती रोज होणार आहे. रोज 1542 सिलेंडर तयार होतील यामुळे संभाव्य लाट आली तरी ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही असा विश्वास जिल्हाधिकारी चव्हाण यांनी व्यक्त केला.

रुग्ण दाखलसाठी नवे सॉफ्टवेअर : कोरोनाकाळात अनेक रुग्णालयांनी गंभीर रूग्णांना दाखल करून घेण्यास नकार दिल्याच्या घटनांकडे लक्ष वेधले असता चव्हाण म्हणाले, यापुढे असे प्रकार होऊ नयेत यासाठी डिजिटल डमिशनचा आमचा प्रयत्न आहे. तशा प्रकारचे सॉफ्टवेअर तयार झाले आहे. माझी हेल्थ माझ्या हाती या पला रूग्णालये जोडून डिजीटल डमिशचे नियोजन आहे.