नायगाव : नायगाव तालुक्यात नेहमीच चर्चेत असलेल्या अवैध देशी दारू विक्री करणारी टोळी सक्रीय असून  रात्री बेरात्री देशी दारूची साठवणूक केल्या जात असल्याीचे दिसून येत आहे. दारूबंदी अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे देशी दारू विक्री करणार्‍यांना पाठबळ मिळत असल्या चे दिसत आहे. आतापर्यंत दारूबंदी अधिकार्‍याकडून कोणतीच कारवाई झाल्याचे दिसत नाही.      
4 ऑक्टोबर रोजी बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चित चांडक व कुंटूर  ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांना  अवैधरित्या देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून सपोनि पुरी यांनी उपनिरीक्षक संजय आटकोरे यांच्यान पथकाने  बरबडा येथील पुनर्वसन परिसरात छापा मारला. या ठिकाणी गंगाधर मदेवाड रा. बरबडा या आरोपीकडून देशी दारू संत्रा लेबल असलेले 24 बॉक्स जप्तग केले. त्या ची किंमत 69 हजार 120 रुपये आहे. मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध बिलोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार सपोनि महादेव पुरी यांच्या फिर्यादीवरून कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या कारवाईमुळे उत्पादन शुल्क विभागाचे मात्र पितळ उघडे पडले आहे. ही कारवाई बिलोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी आयपीएस अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय आटकोरे यांच्या पथकातील यांचे सहकारी पोकॉ.कंधारे, पोहेकॉ. एस.एम.कुमरे, पोकॉ.अशोक घुमे ,ड्रॉयव्हर रामेश्वर पाटील याच्या पथकाने छापा मारण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. या कारवाईमुळे कुंटूर पोलिसांचे परिसरातील जनतेतून कौतुक होत आहे.

आरोपीला अटक : पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या बरबडा येथील पुनर्वसन व साठे मधील समाज मंदिराच्या खोलीत अवैधरित्या देशी दारूची साठवणूक केल्याची माहिती बिलोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी आयपीएस अर्चित चांडक यांना मिळाली. चांडक यांच्या आदेशानुसार ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय अटकोरे यांच्या पथकाने पाळत ठेवून रविवारी सायंकाळी 8:30 वाजताच्या  बरबडा समाज मंदिरात साठवणूक करून ठेवलेल्या ठिकाणी छापा मारून  69 हजार 120 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी गंगाधर मदेवाड याना अटक केली आहे.