
धुमसत्या काश्मीरचा संदेश
काश्मीरमध्ये सध्या 1980 -90 च्या दशकासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. हिंसाचार किंवा दहशतवादी कारवाया या काश्मीरसाठी नव्या नाहीत; मात्र आता दहशतवाद्यांनी आपली रणनीती बदलली आहे. सैन्याच्या कठोर आणि आक्रमक पवित्र्यामुळे दहशतवाद्यांनी परप्रांतियांचा आणि काश्मिरमधील पंडितांचा, मुस्लिमेतर धर्मीयांचा संहार सुरू केला आहे. पूर्वी ज्या भागात दहशतवादी कारवाया होत नसत तिथेही आता दहशतवादी कृत्ये घडत आहेत. या परिस्थितीला भारतीय लष्कर सक्षमपणाने तोंड देईलच; पण पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आता दीर्घकालीन रणनीती आखलीच पाहिजे.

चीन-तैवान संघर्ष किती पेटेल?
चीन आणि तैवानमधील संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. कम्युनिस्ट राजवटीच्या राष्ट्रीय दिनाच्या दिवशी चीनने तैवानच्या हवाई हद्दीत आपली 100 लढाऊ विमाने घुसवली. त्यामुळे तैवानमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली, पण संपूर्ण जगातही चिंतेचे वातावरण पसरले. वास्तविक, चीन आणि तैवान यांच्यात दीर्घकाळ तणावाचे संबंध राहिले आहेत. ताज्या संघर्षाच्या निमित्ताने त्यामागील नेमकी कारणे काय आणि हा तणाव नेमका कुठपर्यंत ताणला जाणार आहे, त्याचे परिणाम जगावर आणि इंडो-पॅसिफीक क्षेत्रावर आणि विशेषत: भारतावर काय होणार आहेत, याचा मागोवा घेणारा लेख-

अंमली पदार्थांचा राक्षस
‘डीआरआय’ने अलीकडेच जगातील सर्वांत मोठ्या ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश केला असून, कच्छ येथील मुंद्रा बंदरावर झालेल्या या कारवाईत एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल तीन हजार किलो हेरॉइन जप्त करण्यात आले आहे. सरकारी आकडेवारी पाहिल्यास देशातील सुमारे 50 लाख तरुण हेरॉइनसारख्या अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकले आहेत. हेरॉइन आणि अन्य अंमली पदार्थांबरोबरच विविध औषधांचाही नशेसाठी वापर करण्याचे प्रमाण भारतात वाढत आहे. सशक्त तरुण पिढी आणि देदीप्यमान भविष्यासाठी अंमली पदार्थांचा राक्षस गाडलाच पाहिजे.

अंतराळक्रांतीच्या दिशेने...
अंतराळ संशोधनाचे क्षेत्र हे 130 कोटी भारतीयांच्या प्रगतीचे माध्यम आहे. चांगल्या मॅपिंगची, इमेजिंगची व्यवस्था आणि संचारसेवा आपल्याला अंतरिक्ष क्षेत्रच उपलब्ध करून देते. उद्योजकांसाठी शिपमेंटपासून डिलिव्हरीपर्यंतची प्रक्रिया गतिमान करणारे ते माध्यम असून, शेतकर्यांसाठी हवामानाचा अचूक अंदाज व्यक्त करण्याचे ते माध्यम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा शब्दांत अंतरिक्ष क्षेत्राचे केलेले वर्णन अचूक असून, या क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिल्यास ते अधिक कार्यक्षम होणार आहे.

मलेरियाच्या अंताची सुरुवात
मलेरियावर लस शोधून काढण्याची प्रक्रिया सुमारे 80 वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरू आहे; परंतु त्याला आता यश आल्याचे दिसत आहे. मलेरिया ज्या परजीवीमुळे होतो, त्याचा जीवनक्रम किचकट असल्यामुळे तसेच प्रत्येक अवस्थेत या परजीवीभोवतीचे प्रथिनाचे आवरण बदलत असल्यामुळे त्यावर लस शोधून काढणे जवळजवळ अशक्य मानले जात होते. आता हे शक्य झाले असून, विशेषतः आफ्रिकेतील लाखो बालकांना त्याचा लाभ होईल.

महती कोजागिरीची
दसरा संपला की सर्वांना वेध लागतात ते दिवाळीचे. कोजागिरी पोर्णिमेपासून दिवाळीला खर्या अर्थाने सुरवात होते. त्यादिवशी चंद्राला दुधाचा, खिरीचा नैवेैद्य दाखवून कोजागिरी पोर्णिमा साजरी केली जाते. यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन केले जाते. ‘कोरोना’चे सावट कमी झाल्याने यंदा कोजिगिरीच्या कार्यक्रमांना बहार येणार आहे. या दिवशी घराबाहेर आकाश दिवा लावून दिवाळीच्या कामाला, फराळाला सुरवात होते. कोजागिरी पोर्णिमेचे ऐतिहासिक, धार्मिक, शास्त्रीय संदर्भ तर आहेतच; पण आरोग्यासाठीही ती लाभदायक ठरते.

माय-लेकरांची कुचंबणा
लखिमपूर दुर्घटनेसंदर्भात आपल्याच पक्षावर टीका करणारे वरूण हे भाजपाचे एकमेव नेते ठरले. त्यांनी तीन कृषी कायद्यांनाही सतत विरोध केलेला आहे. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांना चार महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे वरुण गांधी यांची गय केली जाणार नाही हे स्पष्ट होते. त्यानुसार खासदार वरूण आणि सुलतानपूरच्या खासदार मनेका यांना भाजपाने आपल्या 80 सदस्यांच्या राष्ट्रीय कार्यकारणीमधून तात्काळ डच्चू दिला आहे. भविष्यात हे माता-पुत्र भाजपामध्येच राहतात की वेगळा मार्ग पत्करतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.

चीनचा कावेबाजपणा
भारत आणि चीन यांच्यामध्ये लष्करी पातळीवरील सीमातंटा सोडवण्यासाठी नुकतीच पार पडलेली 13 वी बैठक अपयशी ठरली. बाराव्या बैठकीपर्यंत सामोपचाराच्या भूमिकेत असणार्या चीनने 13 व्या बैठकीत अचानकपणाने आडमुठी भूमिका घेतलेली दिसली. याचे कारण शोधताना आपल्याला या दोन बैठकांदरम्यानच्या काळात घडलेल्या घटनांचा धांडोळा घ्यावा लागेल. भारत-अमेरिका यांच्यातील संबंध जेव्हा जेव्हा घनिष्ट होत जातात तेव्हा तेव्हा चीनकडून अशा प्रकारच्या कुरघोड्या केल्या जातात. तसेच भारताला चर्चेत गुंतवून चीन नेहमीच युद्धाची तयारी करत असतो, हे विसरता कामा नये.

‘विजयोत्सवा’चा भावार्थ
दसरा हे देशाच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. एकता, बंधुभाव आणि सत्यमेव जयते हा संदेश दसरा देतो. प्रादेशिक विविधता असूनसुद्धा हा सण संपूर्ण देशभरात उत्साहाने साजरा केला जातो. देशभरात जागोजागी दसर्याच्या दिवशी रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाते. प्रभू रामचंद्रांचा आदर्श आत्मसात करणे आणि आपल्या इंद्रियांवर, दुष्प्रवृत्तींवर विजय मिळविणे हाच यामागील उद्देश असतो. या दिवशी आत्मचिंतन करून आपल्यातील दोष शोधून आपल्यातील रावणाचा विनाश केला, तरच दसर्याचा सण खर्या अर्थाने साजरा केला असे होईल.

औषधनिर्मितीत संशोधन आवश्यक
आज जगभरात अधिकांश लोक भारतात तयार झालेल्या औषधांचा आणि लसींचा वापर करीत आहेत. आपल्या देशातसुद्धा औषधांना आणि लसींना मोठी मागणी आहे. या क्षेत्रात कमतरता आहे, ती एकाच गोष्टीची आणि ती म्हणजे संशोधनाकडे केले जाणारे दुर्लक्ष. संशोधनावर लक्ष केंद्रित करून आपण आपल्या अर्थव्यवस्थेतही योगदान देऊ शकतो आणि जगात भारताचा मानमरातबही वाढवू शकतो.