Date: Monday, May 21, 2018
Follow us on:


Photo Gallery

अवकाळी दशा....

औरंगाबाद शहरात आज वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरातील विविध भागात दुचाकी चालकांना धुळीचा सामना करावा लागला. अवकाळी पावसाच्या येण्याने शहरवासियांना काही क्षण गारावा मिळाला.
छाया कय्युम खान

DSC_4588.JPGDSC_4592.JPGDSC_4609.JPG

बर्फवृष्टी


बर्फाखाली झाकल्या गेलेल्या शिमल्यातील सांजौली परिसरातील घरांचे हे दृश्य. शनिवारी रात्रभर झालेल्या या बर्फवृष्टीमुळे शिमला, मनाली व डलहौसी या पर्यटन स्थळांचा उर्वरित हिमाचल प्रदेशाशी संपर्क तुटला आहे.

saturday-himachal-hindustan-january-january-covered-sanjauli_5a29597c-d4ad-11e6-a877-a82e4b02bda2.jpg

परिवाराकडून औक्षण...

सहकाररत्न अंबादासराव मानकापे पाटील यांच्या 
अमृतमहोत्सवी अभीष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी मानकापे पाटील परिवारातील महिला सदस्यांनी दादांचे औक्षण केले. दादांचे औक्षण करताना डावीकडून वनिता मानकापे पाटील, सुनंदा मानकापे पाटील, रेखा लहाने, रंजना 
मिरकर. शेवटच्या छायाचित्रात सौ. तुळसाबाई अंबादासराव मानकापे पाटील औक्षण करताना.

DSC_1948.JPGDSC_1953.JPGDSC_1955.JPGDSC_1959.JPGDSC_1965.JPG

दादासाहेब; स्वकर्तृत्वावर उंचीगाठलेला माणूस

 सहकाररत्न अंबादासराव मानकापे पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आदर्श समूहाच्या वतीने कौटुंबिक सोहळ्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी त्यांच्या कुटुंबाच्या वतीने अभीष्टचिंतन करण्यात आले. याप्रसंगी मानकापे कुटुंबातील चिरंजीव सुनील व अनिल, सुविद्य पत्नी सौ. तुळसाबाई, कन्या सौ. रंजना मिरकर, सुना सौ. सुनंदा अनिल मानकापे, सौ. वनिता सुनील मानकापे तसेच आदर्श परिवारातील इतर सदस्य उपस्थित होते. (छाया: कय्यूम खान)

 अभीष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी आदर्श महिला नागरी सहकारी बँकेच्या संचालक सदस्यांनी दादांना शुभेच्छा दिल्या, याप्रसंगी डावीकडून स्वप्नरेखा चव्हाण, तनुजा कंदी, रंजना मिरकर, सुनंदा कुलकर्णी, अनुराधा खोंडे, अध्यक्षा सुनंदा मानकापे पाटील
 अभीष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी आदर्श महिला नागरी सहकारी बँक व पतसंस्थेचे कर्मचार्‍यांनी दादांना शुभेच्छा दिल्या, याप्रसंगी मुख्यव्यवस्थापक डी.एस.अधाने, वसुली अधिकारी वंदना पुरणकर यांच्यासह संतोष आगे, रामेश्‍वर नांगुर्डे, रवींद्र पुराणिक, टी.एन.माढेकर, एस.बी.डिडोरे, एन.के.चोथे.
 धूपखेडा येथील साई साधना आश्रमाचे प्रमुख बलदेवजी भारती यांनी दादांना टिळा लावून आशीर्वाद दिला.
 लोकविकास बँकेचे संस्थापक जे.के.जाधव, काँगे्रसचे विनायकराव बोरसे यांनी दादांना शुभेच्छा दिल्या.
 शुभेच्छा देताना कुबेर नाना, पटेलभाई 
 शुभेच्छा देताना माजी पणन संचालक डॉ.सुभाष माने
सोहळ्यानिमित्त दादांसोबत चहापानप्रसंगी सहकारी मित्र अ‍ॅड.साळुंके, पी.टी.चव्हाण, अ‍ॅड.ललित जोशी, बाबूराव दुधगावकर.
दादांचे अभीष्टचिंतन करताना काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष विलासबापू औताडे, काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष अनिल मानकापे पाटील

DSC_1873.JPGDSC_1879.JPGDSC_1894.JPGDSC_1997.jpgDSC_2013.JPGDSC_2031.JPGDSC_2033.JPGDSC_2073.JPGDSC_2085.JPG

r

DSC_1394.JPG

धूपखेडा येथे वृक्षारोपण

वृक्षारोपण करताना बिडकीन शाखा व्यवस्थापक संतोष खणसे, आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य व्यवस्थापक देविदास अधाने, अंकुश खणसे व जगन्नाथ वंजारे. (सर्व छायाचित्र : श्याम पलाये)

DSC_5667.jpg

स्वामी बलदेवसिंहजी महाराज

दैनिक आदर्श गांवकरीच्या मुख्य कार्यालयाला धूपखेड्याच्या साईसाधना आश्रमाचे प्रमुख स्वामी बलदेवसिंहजी महाराज यांनी दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी त्यांचे स्वागत करताना आदर्श समूहाचे संस्थापक अध्यक्ष अंबादासराव मानकापे पाटील. दुसर्‍या छायाचित्रात स्वामी बलदेवसिंहजी महाराज यांनी आदर्श गांवकरी परिवारास साईप्रतिमा भेट दिली. त्याचा स्विकार करताना संचालक-संपादक डॉ.अनिल फळे, एचआर हेड अक्षता रावकर, संतोषभाऊ चोपडे, रवी पाटील शेळके, भरतभाऊ कल्याणकर, राहुल चव्हाण. (छाया: श्याम पलाये)

DSC_4354.JPG

जाणती नजर...

महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण राष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते श्री शरद पवार यांनी औरंगाबाद भेटीत दैनिक गांवकरी...आदर्श गांवकरी मराठवाडा आवृत्ती अशी बारकाईने वाचली.

DSC_2802.JPG

विम्याचे वितरण...

बीड : पीक विमा बँकेत जमा झाल्याने शेतकरी गर्दी करू लागले असून शहरातील बालेपीर परिसरात असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेमध्ये अशी लांबलचक रांग लागली होती. छाया - नारायण गांधले

BEED CAPTION.jpg

वृक्षारोपण

लातूरच्या बिडवे इंजिनिअरिंगजवळील शिवगणेशनगर परिसरात रस्त्यांच्या बाजूने 101 वृक्षांची लागवड करणारे वसुंधरा प्रतिष्ठानचेे कार्यकर्ते.

LATUR  NEWS     1.jpg

प्रतीक्षा

औरंगाबाद-नगर महामार्गावरील पंढरपूर येथे प्रवाशी निवारा नसल्याने प्रवाशांना रस्त्यावर उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते.

VALUJ STAND  1.jpg

फुकटजादे...

शहरातील औरंगपुरा भागात एस.बी. कॉलेज परिसरात फ्री वायफाय असल्यामुळे अनेक फुकटे शाळा, महाविद्यालये सोडून या ठिकाणी अशा प्रकारे मोबाईलवर चॅटिंग करताना दिसतात. छाया - श्याम पलाये

DSC_2235.JPG

दुष्काळी कारंजे...

पैठण रोडवरील बीड बायपास टी. पॉईंटजवळ जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. यामुळे पैठण रोडवर पाणीच पाणी झाल्याने वाहनांना मार्ग काढणेही कठीण जात होते. (छाया : श्याम पलाये)

IMG_0042.jpg

घाणच घाण...

मध्यवर्ती बसस्थानक आगारात ठिकठिकाणी कचर्‍याचे असे ढीग साचलेले दिसतात. एसटी महामंडळाकडे सफाई कर्मचार्‍यांची स्वतंत्र यंत्रणा असल्यानेच कदाचित ही अवस्था झाली असावी, असे प्रवासी नेहमी उपरोधाने बोलतात. (छाया : कय्यूम खान)

DSC_3425.jpg

तळकप्प्यातील ठेवा...

एकेकाळी खाम नदीच्या विहंगम पात्राची विलोभनीय पार्श्‍वभूमी कौतुकाने मिरवणारा बीबी का मकबरा अजूनही तिच्या स्थितप्रज्ञ जिवलगासारखा होता तसाच आहे. काळाच्या ओघात खाम नदीची रया गेलेली असली, तरी परिसरातील माणसांची वस्ती दिवसेंदिवस वाढत असून, ही ऐतिहासिक वास्तू जणू ‘भेटीत तृप्तता मोठी’ असे गुंजारव खाम नदीसाठी आळवत असावी... निर्दयी माणसांना पर्यावरणाचा संदेश देणारे हे बिबी का मकबरा आणि खामनदीचे मुकरूदन कदाचित असे सहज कळणार नाही. छाया :कय्यूम खान

DSC_3442.jpg

दिंडी शाळा प्रवेशाची

यंदाच्या शैक्षणिक वर्षातील शाळेच्या पहिल्याच दिवशी आज माळीवाडा येथे जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांची शाळा प्रवेश दिंडी काढण्यात आली. या दिंडीत उपसरपंच भीमराज बर्डे यांच्या पुढाकाराने प्रतिष्ठित नागरिक व शाळेतील शिक्षक-शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. सामान्यज्ञान वाढविणे व मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून वर्तमानपत्रांचे नियमित वाचन करण्याचे महत्त्व ‘दैनिक आदर्श गांवकरी’चे उदाहरण देत पटवून दिले. (छाया: शिवाजी आस्वार)

maliwada school pic.1.jpg

मार्गदर्शन

वैद्यनाथ बँक प्रचारार्थ गेवराई येथे सभासदांना मार्गदर्शन करताना खासदार डॉ. प्रीतम मुंडे व सदस्य.

GEAORAI VAIDHNATH.jpg

शुभेच्छा माजी मुख्यमंत्र्यांच्या

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आदर्श गांवकरीला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी डावीकडून संजय देशमुख लहानकर, संजय बेळगे, हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर,आ. राजूरकर. (छाया: अविनाश हंबर्डे)

NANDED 1.jpg

केका केकी...!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसाला एमआयएमचे खासदार असदोद्दीन यांचा चेहरा असलेला केक कापला. या आधी राज ठाकरे यांनी ‘भैय्या’ असे लिहिलेला केक कापला होता. महाराष्ट्राच्या प्रतिमेतून विदर्भाचा केक कापणार्‍या श्रीहरी अणेंना खडे बोल सुनावले होते. राज ठाकरे यांची ही केका केकी सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि एकच गोंधळ उडाला. आगामी महानगरपालिकेच्या तोंडावर आता हिंदुत्व-हिंदुत्व केले जाऊ शकते. जसे या आधी मराठीचा मुद्दा लावून धरला होता.

52744925.jpg

सत्कार

दैनिक आदर्श गांवकरी आयोजित अप्रतिम ग्रामविकास महाचर्चेच्या उद्घाटन सोहळ्यात ग्रामविकास, महिला व बालकल्याण आणि जलसंधारणमंत्री पंकजा पालवे - मुंडे यांच्या हस्ते ग्रामीण भाागातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी झटणार्‍या आदर्श नागरी महिला सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा सौ. सुनंदाताई मानकापे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. (छाया : श्याम पलाये)

DSC_2885.JPG

‘जलयुक्त’चे फळ

बीड : जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ’जलयुक्त’ मधून झालेली बंधारे अशी भरली आहेत.

NARAYANGARH 1.jpg

दैनिक गांवकरीचे जंगी स्वागत

दैनिक आदर्श गांवकरी आयोजित अप्रतिम पर्यावरण महाचर्चेच्या प्रारंभी पर्यावरण विशेषांकाचे प्रकाशन करताना पर्यावरणमंत्री रामदास कदम, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे. सोबत डावीकडून महापौर त्र्यंबक तुपे, आमदार अर्जुनराव खोतकर, दैनिक गांवकरीचे संचालक संपादक डॉ. अनिल फळे, जि.प. अध्यक्ष श्रीराम महाजन, आमदार संजय सिरसाट, सभागृह नेता राजेंद्र जंजाळ, आदर्श समुहाचे संस्थापक अध्यक्ष अंबादासराव मानकापे पाटील. (छाया : कय्युम खान)

DSC_2461.JPG

दैनिक गांवकरीचे जंगी स्वागत

दैनिक गांवकरीच्या प्रथम अंकाचे वाचन करताना एक नागरिक.

DSC_0935.JPG

दैनिक गांवकरीचे जंगी स्वागत

अंकाचे उत्सुकतेने वाचन करताना रिक्षाचालक. (छाया : श्याम पलाये)

DSC_0966.JPG

दैनिक गांवकरीचे जंगी स्वागत

हसतमुखाने अंकाचे निरीक्षण करताना तरुण,

DSC_0953.JPG

दैनिक गांवकरीचे जंगी स्वागत

दैनिक गांवकरीच्या प्रथम अंकात गढून गेलेला तरुणवर्ग

DSC_0938.JPG

दैनिक गांवकरीचे जंगी स्वागत

औरंगपुरा येथील बसथांब्यावर दैनिक गांवकरीच्या प्रथम अंकाचे वाचन करताना नागरिक.

DSC_0957.JPG

दैनिक गांवकरीचे जंगी स्वागत

दैनिक गांवकरीचा प्रथम अंक न्याहाळताना एक टपरीचालक महिला.

DSC_0954.JPG

दैनिक गांवकरीचे जंगी स्वागत

प्रथम अंकाचे गांभीर्याने वाचन करताना एक वृद्ध.

DSC_0963.jpg

दैनिक गांवकरीचे जंगी स्वागत

दैनिक गांवकरीच्या अंकात स्वत:च्या मुलीसाठी काय तजवीज करण्यात आली. याचे काळजीपूर्वक निरीक्षण करताना एक पालक.

DSC_0927.JPG

दैनिक गांवकरीचे जंगी स्वागत

नक्षत्रवाडी येथील मातोश्री वृद्धाश्रमात दैनिक गांवकरीचे संचालक-संपादक डॉ. अनिल फळे यांनी उपस्थितांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. त्यांच्या समवेत बराच वेळ घालवला. यावेळी आश्रमातील वृद्धांच्या हस्ते दैनिक गांवकरीचे प्रकाशन करून आशीर्वाद घेतला.

DSC_1005.JPG

मराठवाडा झाला ‘गांवकरी’मय

नांदेड : येथील शारदा भवन शिक्षण संस्थेच्या आय.टी.एम. सभागृहात दैनिक गांवकरीच्या अंकाचे प्रकाशन आमदार डी. पी. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डावीकडून प्रताप कदम, लक्ष्मीकांत गोणे, नगरसेवक विजय येवनकर, अमितसिंह तेहरा, किशोर स्वामी, शफी अहमद कुरेशी, प्रा. सी.टी.कांबळे, जि. प्र. श्रीपाद देव, श्रीकांत गुंजकर, आनंद चव्हाण, जाहिरात प्रतिनिधी शंकर भोसले आणि कटकमवार. (छाया: सतीश शर्मा)

nanaded dev.jpg

मराठवाडा झाला ‘गांवकरी’मय

परभणी: दैनिक गांवकरीचे सेलू येथे उत्साहात स्वागत झाले. यावेळी साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, नाना मुळावेकर, राजेश ढगे, रतन दायमा, सुनील खेरडकर यांच्यासह तालुका प्रतिनिधी निसार पठाण, मोहसीन आदी.

SELU RAMJAN MUBARAK.jpg

मराठवाडा झाला ‘गांवकरी’मय

माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड येथे दैनिक गांवकरीचे अवलोकन करताना गांवकरी.

dindrud vachak.jpg

मराठवाडा झाला ‘गांवकरी’मय

वैजापूरमध्ये तरुणवर्गाकडूनही दैनिक गांवकरीचे असे स्वागत केले गेले.

vaijapur.jpg

मराठवाडा झाला ‘गांवकरी’मय

आष्टी तालुक्यातही दैनिक गांवकरीचे जोरदार स्वागत झाले. पहिलाच अंक वाचण्यासाठी गावकर्‍यांच्या नजरा अशा खिळल्या होत्या.

AASHTI 1.jpg

मराठवाडा झाला ‘गांवकरी’मय

उस्मानाबाद येथे दैनिक गांवकरीचे स्वागत करताना शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, दै. गांवकरीचे विशेष प्रतिनिधी सुनील ढेपे व जिल्हा प्रतिनिधी सुधीर पवार.

OSMAN.. DHEPE DUDHGAONKAR PAWAR.jpg

मराठवाडा झाला ‘गांवकरी’मय

हिंगोली : नरसी येथे दैनिक गांवकरीच्या स्वागतासाठी भाजपचे माणिकराव लोहगावे, तंटामुक्‍ती अध्यक्ष सय्यद इस्माईल, इब्राहिम बेग पटेल, पत्रकार मनोहर तेलंग, सुभाष पेरकेवार, सय्यद जाफर, गंगाधर गंगासागरे, गोविंद टोकलवार, लक्ष्मण बरगे, गंगाधर कोत्तावार, जळबा गवाले, शफीखान पठाण आणि एसटी महामंडळाचे बच्चेवार उपस्थित होते.

narsi phata pathan.jpg

मराठवाडा झाला ‘गांवकरी’मय

उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम येथे दैनिक गांवकरीचे मनापासून वाचन करताना ग्रामस्थ.

MURUM NIMBARGE.jpg

मराठवाडा झाला ‘गांवकरी’मय

केज शहरात दैनिक गांवकरीचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार दीपक देशपांडे, हनुमंत भोसले, मधुकर सिरसाट, हनुमंत सौदागर, सतीश केजकर, संतोष केजकर, भागवतराव ढाकणे, गदळे सर, प्रा. मुंडे, दिलीप गवळी, उगलमुगले, नंदू मोरे आणि तालुका प्रतिनिधी सुहास चिद्रवार.

KAIJ SUHAS.jpg

मराठवाडा झाला ‘गांवकरी’मय

वैजापूर : येथे ‘दैनिक गांवकरी’चा अंक काळजीपूर्वक वाजताना एक वाचक.

vaijapur 1.jpg

अप्रतिम पर्यावरण दिंडी

पर्यावरण दिंडीचा समारोप दैनिक गांवकरीच्या कार्यालय परिसरात झाला. त्यावेळी विसावलेले पर्यावरणप्रेमी.

DSC_0518.JPG

अप्रतिम पर्यावरण दिंडी

वूई फॉर इन्व्हायर्मेंट संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी पर्यावरण दिंडीत उत्साहाने सहभाग घेतला.

DSC_0139.JPG

अप्रतिम पर्यावरण दिंडी

’अप्रतिम पर्यावरण दिंडी’त भजनी मंडळाबरोबर पावली खेळताना खासदार चंद्रकांत खैरे, संपादक-संचालक डॉ. अनिल फळे.

DSC_0127.JPGDSC_0291.JPG

मोफत पाणीपुरवठा...

परळी वैजनाथ : येथील सामाजिक कार्यकर्त्या सुमनबाई उत्तमराव देशमुख यांच्या विठाई महिला भजनी मंडळाच्या वतीने शहरातील टंचाईग्रस्त भागात मोफत पाणीपुरवठा करण्याच्या उपक्रमास सोमवारी (ता. 30) सुरुवात करण्यात आली. गणेश पार भागातील भाजीमंडई परिसरात टँकरद्वारे पाणी भरताना नागरिक.

parli panitanchai...jpg

मोफत बियाणे वाटप...

सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता डी.जी. मळेकर यांच्या हस्ते एल्डोराडो अ‍ॅग्रोटेक प्रा. लि. श्रीकार बियाणे कंपनीकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मोफत बियाणे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पौंडुळ, कमळेश्‍वर धानोरा व ब्रम्हनाथ येळब येथील ग्रामस्थ.

mofat biyane1.jpg

सत्कार

हिंगोली- जयाजी पाईकराव यांचा सत्कार करतांना भिसे व कार्यकतेर्र् (छाया-सुधाकर वाढवे)

1 june photo 03.jpg

भव्य मिरवणूक

अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबाद शहरातून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिस्तबद्ध मिरवणुकीत सहभागी झालेल्या महिला तर दुसर्‍या छायाचित्रात जल्‍लोष करताना तरुणवर्ग. (छाया: श्याम पलाये)

DSC_0423.jpg

शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन

शिक्षक कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी तरतूद करण्याचे सरकारला आदेश द्यावे या मागणीचे निवेदन आमदार विक्रम काळे, दत्तात्रय सावंत, सतीश चव्हाण यांनी सोमवारी राज्यपाल विद्यासागरराव यांना मुंबईत सादर केले.

MLA Kale, Governor.jpg

उद्घाटन

समर्थनगर वॉर्डमध्ये समांतर जलवाहिनी कामाचे उद्घाटन राजू वैद्य यांच्या हस्ते झाले. जयवंत ओक, ऋषिकेश खैरे यावेळी उपस्थित होते.

Samnatar Jalwahin.jpg

समर्थनगर वॉर्डमध्ये समांतर जलवाहिनी कामाचे उद्घाटन राजू वैद्य यांच्या हस्ते झाले. जयवंत ओक, ऋषिकेश खैरे यावेळी उपस्थित होते.

येरे घना, येरे घना...

कृत्रिम पाऊस... मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता गेल्या वर्षी राज्य सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याचा असफल प्रयत्न केला. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर कृत्रिम पाऊस पाडणारे यंत्र आजही बसविलेले आहे. यावर्षी पाऊसमान चांगले असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे या यंत्राचा मराठवाड्याला फायदा होण्याची शक्यता कमीच आहे. (छाया: कय्यूम खान)

DSC_0725.jpg

जन्मोत्सव...

अहिल्याबाई होळकर यांचा जन्मोत्सव (दि.31 मे) उद्या राज्यभर साजरा होणार आहे. जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला शहरातील अहिल्याबाई होळकर चौकात रोषणाई केल्याने परिसर उजळून निघाला. (छाया: श्याम पलाये)

DSC_0294.jpg

पाण्यात डुबक्या...

उन्हाच्या उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी म्हशींनी सलिम अली सरोवरात डुबक्या मारल्या. छाया : कय्युम खान

DSC_0752.jpg

चाहूल पावसाची...

शहरवासी पहिल्या पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. शनिवारी क्रांतीचौक येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर आकाशात आलेले ढग पावसाळा जवळ आल्याचे संकेत देतात. छाया : श्याम पलाये

DSC_0095 123.jpg

चिऊताईची तृषार्त धडपड ...

पिलांसाठी जीव झाडाला टांगणारी सुगरण बहिणाबाई चौधरींना भावली, ती तिच्या चिवटपणामुळे; या छायाचित्रातला पक्षीही पाण्यासाठी झगडताना चोचीत आलेला एक थेंब अवधान सुटल्याने निसटला तरी चिवटपणा न सोडता हार न मानण्याचा संदेश देत असावा. छाया ः कय्युम खान

DSC_0563.jpgDSC_0566.jpgDSC_0569.jpg